esakal | दिल्लीत केजरीवालांचा 'झाडू' करणार भाजप, काँग्रेसचा सुपडासाफ?
sakal

बोलून बातमी शोधा

arvind kejriwal

असे असेल वेळापत्रक 
अधिसूचना -14 जानेवारी 
निवडणूक अर्ज भरण्यास प्रारंभ - 21 जानेवारी 
उमेदवारी अर्ज छाननी - 22 जानेवारी 
अर्ज माघारीची अंतिम मुदत - 24 जानेवारी 
मतदान - 8 फेब्रुवारी 
निकाल - 11 फेब्रुवारी

दिल्लीत केजरीवालांचा 'झाडू' करणार भाजप, काँग्रेसचा सुपडासाफ?

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : बहुचर्चित दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्ष मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सत्ता मिळविणार हे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील 70 जागांपैकी 59 जागांवर 'आप'चा विजय होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्ली विधानसभेचे बिगुल वाजले असून, दिल्लीतील 70 जागांसाठी एकाच टप्प्यात 8 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर 11 फेब्रुवारीला निकाल जाहीर होईल. दिल्लीत सत्ताधारी आम आदमी पक्ष विरुद्ध भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस असा तिरंगी मुकाबला रंगणार आहे. दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ 22 फेब्रुवारीला संपुष्टात येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 21 जानेवारी असेल. तर छाननी 22 जानेवारीला होईल. 24 जानेवारी हा अर्जमाघारीचा शेवटचा दिवस असेल. 8 फेब्रुवारीला मतदान होऊन 11 फेब्रुवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. 

दिल्लीत 8 फेब्रुवारीला मतदान अन् 11 फेब्रुवारीला निकाल

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने 70 पैकी 67 जागा जिंकून सर्व प्रस्थापित पक्षांना जोरदार धक्का दिला होता. त्या वेळी भारतीय जनता पक्षाला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले होते. तर सलग तीन निवडणुकांमध्ये दिल्लीच्या तख्तावर राज्य करणाऱ्या काँग्रेस पक्षाला भोपळादेखील फोडता आला नव्हता. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची असणार आहे. 

नवीन वर्षात व्हा 'डिजिटल' गुंतवणूकदार!

'सी व्होटर' केलेल्या सर्वेक्षणात 'आप'ला 54 ते 64 म्हणजे सरासरी 59 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गेल्यावेळी मिळालेल्या जागांच्या तुलनेत यंदा कमी जागा मिळतील असा अंदाज आहे. तर, भाजपला 3 ते 12, काँग्रेसला 0 ते 6 अशा जागा मिळण्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. विधानसभेत सत्ता मिळविण्यासाठी 36 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेस यंदा भोपळा फोडू शकते, असेही म्हटले आहे.

असे असेल वेळापत्रक 
अधिसूचना -14 जानेवारी 
निवडणूक अर्ज भरण्यास प्रारंभ - 21 जानेवारी 
उमेदवारी अर्ज छाननी - 22 जानेवारी 
अर्ज माघारीची अंतिम मुदत - 24 जानेवारी 
मतदान - 8 फेब्रुवारी 
निकाल - 11 फेब्रुवारी

loading image