हुकूमशहा मोदींना आणखी एक चपराक: केजरीवाल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - अरुणाचल प्रदेशबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर "पंतप्रधान नरेंद्र मोदी आता धडा घेतील आणि लोकशाही पद्धतीने निवडलेल्या सरकारमध्ये हस्तक्षेप करणे थांबवतील अशी आशा आहे‘, अशा प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केल्या आहेत. 

अरुणाचल प्रदेशमध्ये कॉंग्रेसचे सरकार पुन्हा स्थापन करण्याचा आदेश आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाने दिला. न्यायालयाचा हा निर्णय केंद्र सरकारसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. याबाबत केजरीवाल यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘हुकूमशहा मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने आणखी एक जबरदस्त चपराक दिला आहे. आता तरी मोदीजी यातून धडा घेतील आणि लोकशाहीपद्धतीने निवडून दिलेल्या सरकारमध्ये हस्तक्षेप करणे थांबवतील‘, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. 

याशिवाय दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनीही मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरद्वारे लिहिले आहे, "मोदीजी! आता तरी लोकशाहीचा आदर करायला शिका. एखाद्या राज्यामध्ये जर लोक अन्य एखाद्या पक्षाला निवडून देतात तर त्यांना शिक्षा देणे थांबवा.

Web Title: Arvind Kejriwal targets Narendra Modi