Loksabha 2019 : प्रचारासाठी अरविंद केजरीवाल 13 एप्रिलला गोव्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

आपचे राज्य निमंत्रक व दक्षिण गोव्याचे उमेदवार एल्वीस गोम्स यांच्या जाहीर सभेत केजरीवाल उपस्थित राहणार आहेत. 

लोकसभा 2019
मडगाव : आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय निमंत्रक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 13 एप्रिल ला गोव्यात येणार असून लोकसभा निवडणुकीसाठी आपच्या प्रचारात ते सहभागी होणार आहेत. आपचे राज्य निमंत्रक व दक्षिण गोव्याचे उमेदवार एल्वीस गोम्स यांच्या जाहीर सभेत केजरीवाल उपस्थित राहणार आहेत. 

आपतर्फे गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागा लढवण्यात येत असून दक्षिण गोव्यातून एल्वीस गोम्स तर उत्तर गोव्यातून प्रदीप पाडगावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गोम्स 2 एप्रिल ला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

'आपचा प्रचार जोरात सुरु असून मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. केजरीवाल 13 एप्रिल ला मडगावात जाहीर सभेसाठी येणार आहेत,' असे गोम्स यांनी सांगितले. 

Web Title: Arvind Kejriwal will come to goa for loksabha election campaign on 13 April