केजरीवाल यांच्या ऑफिसमधील चहाचा खर्च 1.03 कोटी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयामधील तीन वर्षांत चहा व खाद्यपदार्थावर 1.03 कोटी रुपये खर्च झाल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.

नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयामधील तीन वर्षांत चहा व खाद्यपदार्थावर 1.03 कोटी रुपये खर्च झाल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.

अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या कार्यालयातील चहा व खाद्यपदार्थावर किती रुपये खर्च झाला आहे, याबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंतसिंग गौनिया यांनी मागितली होती. त्यांना देण्यात आलेल्या उत्तरामध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये 1,03,04,162 रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले आहे. 2015-16 मध्ये 23.12 लाख रुपये, 2016-17 मध्ये 46.54 लाख रुपये तर 2017-18 मध्ये 33.36 लाख रुपये चहा व खाद्यपदार्थांवर खर्च करण्यात आले आहेत.

गौनिया म्हणाले, 'सर्वसामान्य नागरिकांना एक वेळेसचे जेवण मिळत नसताना दुसरीकडे नागरिकांचा पैसा हा मोठ्या प्रमाणात चहा व खाद्यपदार्थांवर खर्च केला जात आहे. मला अपेक्षा आहे की सरकार या खर्चात कपात करून आदर्श दाखवून देईल.'

Web Title: arvind kejriwals office spent over rs one crore on tea and snacks