'रॉ'च्या प्रमुखपदी सामंत गोयल तर अरविंद कुमार 'आयबी'चे प्रमुख

वृत्तसंस्था
बुधवार, 26 जून 2019

- 'रॉ'चे प्रमुखपद होते अनिल धामसाना यांच्याकडे.

- सामंत गोयल यांना मिळाली बढती. 

नवी दिल्ली : 'रिसर्च अँड अॅनालिसिस विंग' (रॉ) आणि 'इंटेलिजन्स ब्युरो'च्या (आयबी) नव्या प्रमुखांची नावे आज (बुधवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये 'रॉ'च्या प्रमुखपदी सामंत गोयल आणि 'आयबी'च्या प्रमुखपदी अरविंद कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. 

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने 'रॉ' आणि 'आयबी'चे काम आहे. यामध्ये बाहेरील शत्रूंपासून काय धोका पोहोचू शकतो याबाबतची पूर्वकल्पना देण्याची महत्त्वाची जबाबदारी 'रॉ'वर असते तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक माहिती गोळा करण्याची जबाबदारी 'आयबी'वर असते. यापूर्वी 'रॉ'कडून करण्यात आलेल्या कारवाईची जबाबदारी सामंत गोयल यांच्यावर होती. त्यानंतर सामंत यांना या पदावरून बढती देऊन 'रॉ'चे प्रमुख करण्यात आले. 

दरम्यान, यापूर्वी 'रॉ'चे प्रमुखपद अनिल धामसाना यांच्याकडे होते. त्यानंतर आता या पदावर सामंत गोयल यांच्याकडे हा पदभार दिला जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arvind Kumar Is New Intelligence Bureau Head Samant Goel Next RAW Chief