Asad Ahmed Encounter: अतिक अहमदचे पाकिस्तान, ISI, लष्कर-ए-तोयबाशी संबंध; ड्रोनद्वारे मागवायचा हत्यारं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asad Ahmed Encounter

Asad Ahmed Encounter: अतिक अहमदचे पाकिस्तान, ISI, लष्कर-ए-तोयबाशी संबंध; ड्रोनद्वारे मागवायचा हत्यारं

लखनऊः उमेश पाल हत्याकांडातील (Umesh Pal murder case) फरार गँगस्टर अतिकचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम यांना यूपी एसटीएफने एन्काऊंटर मध्ये ठार केले. दोघांवर पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. झाशी येथे त्यांची चकमक झाली. यादरम्यान त्यांच्याकडून विदेशी शस्त्रे जप्त करण्यात आल्याचा एसटीएफने दावा केला आहे.

गँगस्टर ते राजकीय नेता बनलेल्या अतिक अहमद याने उत्तर प्रदेश पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये त्याचे पाकिस्तान, आयएसआय आणि लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याचं म्हटलं आहे. प्रयागराजच्या कोर्टाने उमेश पाल हत्याकांड प्रकरणी गुरुवारी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ याला चार दिवसांच्या पोलिस कोठडीमध्ये पाठवलं आहे.

अतिक अहमद याने कोर्टासमोर जबाब दिला आहे. पोलिसांच्या चार्जशीटमध्ये या जबाबाचा उल्लेख आहे. यामध्ये त्याने म्हटलंय की, माझ्याकडे शस्त्रांची काहीही कमी नाही. कारण पाकिस्तानातून ड्रोनद्वारे माझ्यासाठी पंजाबच्या सीमेवर हत्यारं टाकली जातात. स्थानिक लोक ते एकत्र करतात आणि माझ्यापर्यंत ते पोहोचतात. असं त्याने सांगितलं.

दरम्यान, आजच्या चकमकीबाबत यूपी पोलिसांनी माहिती दिली की, असदचा मुलगा अतिक अहमद आणि त्याचा साथीदार गुलाम हे दोघेही प्रयागराजच्या उमेश पाल खून प्रकरणात वॉन्टेड होते. या दोघांवर आरोपींवर पाच लाख रुपयांचे बक्षीस होते.

झाशीमध्ये डीएसपी नवेंदू आणि डीएसपी विमल यांच्या नेतृत्वाखालील यूपी एसटीएफ टीमसोबत झालेल्या चकमकीत हे दोघे मारले गेले. या दोघांकडून अनेक विदेशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

टॅग्स :Uttar PradeshCrime News