अमित शहा केवळ गृहमंत्री; ते देव नाहीत, औवेसींचे प्रत्युत्तर

amit shah
amit shah

नवी दिल्ली : अमित शहा हे देशाचे फक्त गृहमंत्री आहेत, देव नाहीत; असे म्हणत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी अमित शहांवर टीका केली आहे. भाजपच्या विरूद्ध जे बोलतात त्यांना देशद्रोही मानलं जातं, भाजपने देशद्रोही बनविण्याचं दुकान उघडलं आहे का? असा टोला औवेसी यांनी लगावला. तसेच अमित शहा यांनी माझ्याकडे बोट दाखवत मला धमकी दिली, असा आरोपही त्यांनी केला. 

लोकसभेत सोमवारी एनआयए (राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी) सुधारणा विधेयक मांडण्यात आलं. त्यावेळी सभागृहात झालेल्या चर्चेदरम्यान एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी या विधेयकाचा विरोध करत सरकारकडून बाजू मांडणाऱ्या सत्यपाल सिंह यांचे भाषण थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी ओवैसी यांना तुम्हाला ऐकावं लागेल अशा शब्दात सुनावले होते. 

मुंबईने दहशतवादाला खूप सहन केले आहे, कारण मुंबईत नेहमीच राजकीय चश्म्यातून दहशतवाद पाहिला गेला, असे सत्यपाल सिंह आपल्या भाषणात म्हणत होते. तसेच, हैदराबाद बॉम्बस्फोट प्रकरणी पोलिसांनी काही संशयित अल्पसंख्यांक समुदायाच्या नागरिकांना ताब्यात घेतले. त्यावेळी, चक्क मुख्यमंत्र्यांनी तसे न करण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे पोलीस आयुक्तांना नोकरीवरुन काढून टाकण्यापर्यंतही सुनावण्यात आल्याचे सत्यपालसिंह यांनी म्हटले. त्यामुळे हैदराबादचे खासदार असुदुद्दीने औवेसी यांनी सिंह यांच्या भाषणाला आक्षेप घेतला. मात्र, अमित शहा यांनी औवेसांनी खाली बसण्यास सांगितले. तुम्हाला ऐकावचं लागेल, असे म्हणत औवेसींना टोलाही लगावला. 

औवेसी साहब सुनने की ताकद रखिए, जब ए राजा बोल रहे थे तब आप क्यों नही खडे हुए, एैसे नही चलेगा, आपको सुनना भी पडेगा..असे म्हणत अमित शहा यांनी औवेसींना चांगलाच दम भरला. त्यानंतर, सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. औवेसी यांनी उभं राहून तुम्ही गृहमंत्री आहात, घाबरवू नका, मी घाबरणार नाही असं शहांना बजावलं. त्यावर अमित शहा यांनी कोणाला भीती दाखवली जाऊ शकत नाही. पण भीती मनात असेल तर त्याला काही करु शकत नाही असा टोला औवेसींना लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com