काँग्रेस आता संपली ; ओवेसींची टीका

वृत्तसंस्था
शनिवार, 9 जून 2018

"संपूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये काढल्यानंतर प्रणव मुखर्जी यांनी आरएसएसच्या दारावर डोके टेकले. त्यामुळे आता काँग्रेसकडून कोणतीही अपेक्षा राहिलेली नाही. काँग्रेस आता संपली आहे''.

- खासदार असदुद्दीन ओवेसी, 'एमआयएम' प्रमुख

नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर विरोधकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यानंतर आता 'एमआयएम'चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, "संपूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये काढल्यानंतर प्रणव मुखर्जी यांनी आरएसएसच्या दारावर डोके टेकले. त्यामुळे आता काँग्रेसकडून कोणतीही अपेक्षा राहिलेली नाही. काँग्रेस आता संपली आहे''.

हैदराबाद येथील एका जाहीर कार्यक्रमात ओवेसी बोलत होते. ते म्हणाले, ज्या व्यक्तीने आयुष्यातील 50 वर्षे काँग्रेस पक्षात काढली. तसेच ज्यांनी देशाचे राष्ट्रपतिपद भूषवले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन आपले डोके टेकवले. त्यामुळे काँग्रेस आता संपली आहे, असे वाटते. त्यामुळे या अशा पक्षाकडून तुम्हाला आताही अपेक्षा आहेत का, असा सवालही ओवेसी यांनी विचारला.

Web Title: Asaduddin Owaisi Criticizes Congress