'खोट्या आश्वासनांसाठी मोदी का करत नाहीत उपवास'

वृत्तसंस्था
बुधवार, 11 एप्रिल 2018

मोदींनी दलितांवर होत असलेल्या अत्याचारांबद्दल किंवा बरोजगारीच्या प्रश्नावर उपवास केला पाहिजे. भाजप उपवासाच्या नावावर नाटक करत आहे. काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या खोट्या आश्वासनांसाठी त्यांनी उपवास केला पाहिजे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी उपवास केला पाहिजे, अशी जोरदार टीका एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.

काँग्रेस व विरोधकांनी गोंधळ करून संसद अधिवेशन एक दिवसही चालू न दिल्याच्या निषेधार्थ सत्तारूढ भारतीय जनता पक्षाचे सर्व खासदार, आमदार व पदाधिकारी येत्या 12 एप्रिलला एका दिवसाचा उपवास करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा हेही या सत्याग्रह आंदोलनात सक्रिय सहभाग देतील.

यावरून ओवेसी म्हणाले, की मोदींनी दलितांवर होत असलेल्या अत्याचारांबद्दल किंवा बरोजगारीच्या प्रश्नावर उपवास केला पाहिजे. भाजप उपवासाच्या नावावर नाटक करत आहे. काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. राहुल गांधीही दलितांवर होत असलेल्या अन्यायाबाबत उपवास का करत नाहीत.

Web Title: Asaduddin Owaisi targets Narendra Modi on false promises