..नाहीतर उत्तर प्रदेशचे रस्ते शाहीन बागेत बदलू; ओवेसींचा मोदी सरकारला इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

owaisi

...नाहीतर उत्तर प्रदेशचे रस्ते शाहीन बागेत बदलू - ओवैसी

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (AIMIM Asaduddin owaisi) यांनी उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा केल्यानंरही विरोधक आणि शेतकरी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. एमएसपीच्या हमीशिवाय ते मान्य करणार नसल्याचे शेतकऱ्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. दुसरीकडे एआयएमआयएमचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काय म्हणाले ओवेसी..

...तर आणखी एक शाहीन बाग बनवणार - ओवेसी

“मी पंतप्रधान मोदी आणि भाजपाला कृषी कायद्यासारखे CAA मागे घेण्याचे आवाहन करतो कारण ते संविधानाच्या विरोधात आहे. जर त्यांनी एनपीआर आणि एनआरसी वर कायदा केला तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि इथे आणखी एक शाहीन बाग बांधली जाईल,” असे ओवेसींनी म्हटले.जर एनपीआर आणि एनआरसी कायदे कृषी कायद्याप्रमाणे रद्द केले नाहीत तर ते बाराबंकीला आणखी एक शाहीन बाग बनवतील असा इशारा ओवेसींनी दिला आहे. जर एनपीआर आणि एनआरसी कायदे कृषी कायद्याप्रमाणे रद्द केले नाहीत तर ते बाराबंकीला आणखी एक शाहीन बाग बनवतील असा इशारा ओवेसींनी दिला आहे. तसेच “पंतप्रधान मोदी हे देशातील सर्वात मोठे ‘नौटंकीबाज’ आहेत आणि चुकून ते राजकारणात आले आहेत, नाहीतर चित्रपटसृष्टीतील लोकांचे काय झाले असते. सर्व पुरस्कार मोदींनी जिंकले असते,” असे ओवेसी म्हणाले.

हेही वाचा: 'कबूल, कबूल, कबूल', मलिकांनी मध्यरात्री टाकला बॉम्ब; वानखेडेंची झोप उडणार?

दिल्लीतील शाहीन बाग हे सीएए आणि एनआरसीच्या विरोधाचे केंद्र

दिल्लीतील शाहीन बाग हे सीएए आणि एनआरसीच्या विरोधाचे केंद्र होते. २०२०च्या सुरुवातीला कोविड -१९मुळे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सीएए विरुद्धच्या आंदोलनासाठी शेकडो महिलांनी अनेक महिने तळ ठोकलेल्या निषेध स्थळाची जागा रिकामी केली होती.

हेही वाचा: कर्नाटकात पावसाचं थैमान; महिनाभरात 24 जणांचा मृत्यू

loading image
go to top