रामदेव बाबांमुळे मोदींही मतदानापासून दूर राहतील- ओवेसी 

रामदेव बाबांमुळे मोदींही मतदानापासून दूर राहतील- ओवेसी 

हैदराबाद: "घटनाबाह्य गोष्टींवर बोलण्यास कोणालाही कायद्याने प्रतिबंध करता येत नाही, पण रामदेव बाबा यांच्या अशा कल्पनांना नाहक महत्त्व का दिले जाते?, असा प्रश्‍न "मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन' (एमएआयएम) या पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विटवर सोमवारी केला आहे.
 

रामदेव बाबा त्यांच्या पोटाशीसंबंधित काहीही करू शकतात. पायांची हालचाल कशीही करू शकतात. पण, याचा अर्थ असा नव्हे, की नरेंद्र मोदी हे तिसरे अपत्य आहे म्हणून ते त्यांचा मतदानाचा हक्क बजावू शकत नाहीत, असेही ओवेसी यांनी म्हटले आहे. 

योगगुरू बाबा रामदेव यांनी हरिद्वार येथे काल पत्रकार परिषदेत बोलताना "वाढत्या लोकसंख्येच्या प्रश्‍नावर उपाय शोधण्यासाठी भारत तयार नाही,' असे सांगत काही उपाय सुचविले होते. यात तिसऱ्या अपत्याला मतदानाचा अधिकार देऊ नये. तसेच, सरकारी नोकरीपासून दूर ठेवावे, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. देशाची लोकसंख्या 150 कोटींच्या जास्त होण्यास रोखले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले होते. त्यावर ओवेसी यांनी सोमवारी त्यांच्यावर टीका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com