आसारामची ध्वनिफीत व्हायरल

वृत्तसंस्था
शनिवार, 28 एप्रिल 2018

जोधपूर : बलात्कारप्रकरणी दोषी ठरून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसारामबापू याची ध्वनिफीत प्रसिद्ध झाली असून, यामध्ये तो एका व्यक्तीला दूरध्वनीवरून सुटकेबाबत आश्‍वस्त करत असल्याचे ऐकू येत आहे. "तुरुंगातील आपले दिवस लवकरच संपून चांगले दिवस येतील,' असे आसारामने म्हटले आहे. आसारामने काल (ता. 27) तुरुंग अधिकाऱ्यांच्या परवानगीने केलेल्या दूरध्वनीवरील हा संवाद रेकॉर्ड करून तो प्रसिद्ध केला असण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आपल्याबरोबर शिक्षा झालेल्या दोघांची तुरुंगातून सुटका होण्यासाठी आपण आधी आतूनच प्रयत्न करू, असेही आसारामने या संभाषणात म्हटले आहे.

Web Title: Asaram bapu audio clip viral

टॅग्स