जन्मठेपेची शिक्षा कमी करा: आसाराम बापू

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

जोधपूरः अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूने जन्मठेपेची शिक्षा कमी करण्यासाठी दया याचिका राजस्थानच्या राज्यपालांकडे केली आहे.

जोधपूरः अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूने जन्मठेपेची शिक्षा कमी करण्यासाठी दया याचिका राजस्थानच्या राज्यपालांकडे केली आहे.

राजस्थानच्या राज्यपाल कल्याण सिंह यांच्याकडे केलेल्या याचिकेसोबत आसाराम बापूने आपल्या वयाचा दाखला दिला असून, आपल्याला थकवा जाणवत असल्यामुळे शिक्ष कमी करण्याची विनंती केली आहे. राज्यपाल कल्याण सिंह यांनी याचिका गृह विभागाकडे पाठवली असून, सविस्तर अहवाल मागवला आहे. गृह विभागाने ही याचिका जोधपूर केंद्रीय कारागृह विभागाकडे पाठवली असून, कारागृह विभागाने स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून अहवाल मागवला आहे.

‘आम्हाला आसाराम बापूची दया याचिका मिळाली आहे. आम्ही स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून अहवाल मागवला आहे’, असे जोधपूर केंद्रीय कारागृहाचे अधिक्षक कैलाश त्रिवेदी यांनी सांगितले. अहवाल मिळाल्यानंतर कारागृह प्रशासन महासंचालकांसमोर (कारागृह) तो सादर करेल.

दरम्यान, 25 एप्रिल रोजी आसाराम बापूला 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आसाराम बापूने शिक्षेविरोधात राजस्थान उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र अद्याप याचिकेवर सुनावणी झालेली नाही.

Web Title: Asaram Bapu files mercy plea to Rajasthan Governor