आसाराबापूचा निर्णय 25 पर्यंत राखीव

वृत्तसंस्था
शनिवार, 7 एप्रिल 2018

जोधपूर: बलात्कारप्रकरणी विशेष "एससी - एसटी' न्यायालयाने आज आसारामबापू विरुद्धचा निर्णय 25 एप्रिलपर्यंत राखून ठेवला.

न्या. मधुसूदन शर्मा यांच्यासमोर गेले पाच महिने दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद झाले. आज अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला. या प्रकरणावरील निकाल न्यायाधीशांनी 25 एप्रिलपर्यंत राखून ठेवला आहे.

येथून जवळ असलेल्या मनी गावातील आश्रमात आसाराम बापूने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप उत्तर प्रदेशातील एका अल्पवयीन मुलीने केला होता. 31 ऑगस्ट 2013 पासून आसारामबापू तुरुंगात आहे. या प्रकरणात दोषी आढळल्यास आसारामबापूला दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते.

Web Title: Asaram Bapus decision is reserved till 25th