आशिष खेतान यांनी दिला 'आप'ला राजीनामा

वृत्तसंस्था
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

'माझे संपूर्ण लक्ष हे आता वकिलीकडे असेल, सक्रीय राजकारणात मी सहभागी होणार नाही,' अशा आशयाचे ट्विट खेतान यांनी आज (ता. 22) केले. त्यांच्या राजीनाम्यावर आम आदमी पक्षाकडून अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. 

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते आशिष खेतान यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. आपचे प्रमुख नेते आशुतोष यांनीही काही दिवसांपूर्वी राजीनामा दिल्यानंतर खेतान यांच्यासारख्या मोठ्या नेत्यानेही आता राजीनामा दिला आहे. 

'माझे संपूर्ण लक्ष हे आता वकिलीकडे असेल, सक्रीय राजकारणात मी सहभागी होणार नाही,' अशा आशयाचे ट्विट खेतान यांनी आज (ता. 22) केले. त्यांच्या राजीनाम्यावर आम आदमी पक्षाकडून अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. 

आशिष खेतान यांनी 2014 रोजी आपकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. आपच्या राजकीय कामकाजात ते मागील काही दिवस सहभागी नव्हते. खेतान हे ही पत्रकारिता सोडून राजकारणाकडे वळले होते. 

Web Title: ashish khetan resigns aam adami party