esakal | लखीमपूर | अशिष मिश्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
sakal

बोलून बातमी शोधा

Lakhimpur Uttar Pradesh

लखीमपूर | अशिष मिश्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

sakal_logo
By
ओमकार वाबळे

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर शेतकऱ्यांवर गाडी चालवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू होता. संबंधित गाडी गृहराज्य मंत्र्यांचा मुलगा अशिष मिश्रा चालवत असल्याच्या बातम्या समोर आल्या. यानंतर स्थानिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. यानंतर न्यायालयाने मिश्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला शनिवारी रात्री उशिरा न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला 3 ऑक्टोबरला लखीमपूर हिंसाचारासंदर्भात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या हिंसाचारात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणासंदर्भात सुमारे 12 तासांच्या चौकशीनंतर वैद्यकीय पथकाने गुन्हे शाखा कार्यालयात आशिष मिश्राची तपासणी केली. यानंतर त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यासाठी नेण्यात आले. दंडाधिकाऱ्यांनी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यासंदर्भात फिर्यादी अधिकारी एसपी यादव यांनी पीटीआयला माहिती दिली आहे.

आशिष मिश्राच्या पोलीस रिमांडसाठी अर्ज न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. त्यामार्फत 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता सुनावणी निश्चित करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

3 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या चार शेतकऱ्यांना मारणाऱ्या वाहनांपैकी एका वाहनात अशिष मिश्रा असल्याचा आरोप होत आहे. यानंतर आशिष मिश्राचे नाव एफआयआरमध्ये देण्यात आले.

loading image
go to top