भाजपचे हिंदुत्व फक्त निवडणूक जिंकण्या पुरतेच : अशोक गेहलोत

'देशात ज्या प्रकारे हिंसक घटना घडत आहेत, त्यावरुन देश कोणत्या दिशेने चालला आहे.'
ashok gehlot
ashok gehlotSakal

दिल्ली : देशात ज्या प्रकारे हिंसक घटना घडत आहेत, त्यावरुन देश कोणत्या दिशेने चालला आहे. हे सर्वांना माहित झाले आहे. देशात भयानक धोरण सुरु आहे. देशवासियांना ते समजून घ्यावे लागेल. हिंसा रोखने हे सत्तेत असलेल्या पक्षाचे नेहमी काम असते. मात्र येथे उलटी गंगा वाहत आहे, अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी देशात सुरु असलेल्या हिंसक घटनेवरुन नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारवर टीका केली आहे. गेहलोत हे आज बुधवारी (ता.२०) दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Ashok Gehlot Criticize BJP For Hindutva Politics In Delhi)

ashok gehlot
भारतात खूप काही महागाई नाही - निर्मला सीतारमन

पुढे ते म्हणाले, की त्यांचा (भाजप) हिंदुत्व फक्त निवडणूक जिंकण्या पुरतेच आहे. आमचे हिंदुत्त्व धार्मिक भावनांवर आधारित आहे. जर सर्व लोक आपल्या धर्माव्यतिरिक्त दुसऱ्या धर्माचा आदर करतील तेव्हा देशात हिंसा होणार नाही. देश फक्त विकासाच्या मार्गावर पुढे जाईल, असा विश्वास अशोक गेहलोत यांनी व्यक्त केला.

ashok gehlot
Aurangabad : अश्लील व्हिडिओ प्रकरणी अखेर 'किर्तनकार बाबा' ला अटक

दिल्लीतील जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीच्या दिवशी हिंसाचाराची घटना घडली होती. त्यामुळे या भागात जमावबंदी लागू आहे. मात्र आज बुधवारी दिल्ली महापालिकेने अतिक्रमण विरोधी मोहिमेअंतर्गत जहांगीरपुरी भागातील घरांवर बुलडोझर चालवले. या घटनेवरुन देशातील वातावरण तापले आहे. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे मोहिम बंद करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com