अष्टधातूची 45 कोटींची मूर्ती भारत-नेपाळ सीमेवरून जप्त

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 एप्रिल 2017

सशस्त्र सेना दलाच्या जवानांनी सिलिगुडी शाखेच्या प्रतिबंधात्मक आणि गुप्तचर विभागाच्या (पी ऍण्ड आय) मदतीने केलेल्या कारवाईत भारत-नेपाळ सीमेवरून 45 कोटी रुपयांची अष्टधातूची मूर्ती जप्त केली आहे. मूर्तीची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला ताब्यात घेतले आहे.

सिलिगुडी (पश्‍चिम बंगाल) - सशस्त्र सेना दलाच्या जवानांनी सिलिगुडी शाखेच्या प्रतिबंधात्मक आणि गुप्तचर विभागाच्या (पी ऍण्ड आय) मदतीने केलेल्या कारवाईत भारत-नेपाळ सीमेवरून 45 कोटी रुपयांची अष्टधातूची मूर्ती जप्त केली आहे. मूर्तीची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला ताब्यात घेतले आहे.

ताब्यात घेतलेली मूर्ती ही अष्टधातूंची असून तिचे वजन 24.07 किलोग्रॅम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या मूर्तीची किंमत अंदाजे 45 कोटी रुपयांपर्यंत आहे. मूर्तीची उंची 54 सेमी असून ती बाळकृष्णाची असण्याची शक्‍यता सशस्त्र सेना दलाच्या जवानांनी व्यक्त केली आहे. एक व्यक्ती सिलिगुडी-किसानगंज रस्त्यावरून एक व्यक्ती नेपाळच्या दिशेने मूर्तीची तस्करी करत असल्याची माहिती सशस्त्र सेना दलाला मिळाली होती. त्या माहितीवरून सशस्त्र सेना दलाच्या जवानांनी कारवाई केली.

'अष्टधातूची ही मूर्ती प्राचीन आणि दुर्मिळ असून महाग आहे. मूर्तीची उंची 54 सेमी तर लांबी 23 सेमी आहे. तिचे वजन 24.07 किग्रॅ आहे', अशी माहिती माहिती सीमाशुल्क विभागाचे अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: 'Ashtadhatu' idol worth Rs. 45 crore seized along indo-nepal border