राहुल गांधी वेडे, मनोरुग्णालयात पाठवा: केंद्रीय मंत्र्यांची मुक्ताफळे

ashwini kumar choubey criticise on rahul gandhi
ashwini kumar choubey criticise on rahul gandhi

नवी दिल्ली : भाजपचे केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे यांची जीभ घसरली असून, त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वेड लागले असून त्यांना मनोरूग्णालयात पाठवायला हवे, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. राहुल गांधी यांना स्क्रिझोफेनिया जडला आहे म्हणून त्यांना लवकरात लवकर मनोरूग्णालयात दाखल करायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदीपुढे राहुल गांधी म्हणजे नाल्यातील किड्याप्रमाणे आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. देशाच्या पंतप्रधानाबाबत राहुल गांधी यांनी अपशब्द वापरले आहेत. तसेच महाआघाडीला त्यांनी 'ठगबंधन' असे संबोधले आहे. राहुल गांधी देशात खोट्या गोष्टी पसरवत आहेत. दुसऱ्यांना वेडे म्हणणाऱ्या राहुल गांधी यांनी स्वतःकडे पाहिले पाहिजे त्यांना कोणीही वेडे समजेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

राफेल कराराबाबत जे खोटे राहुल गांधी पसरवत आहेत. मात्र त्यांच्या या आरोपांमध्ये तथ्य नाही. महाआघाडीचा उद्देश कधीच साध्य होणार नाही महाआघाडीचे देशात कधीच सरकार येऊ शकणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com