esakal | जनतेच्या राजकीय हक्कांचे रक्षण करणार; आसामसाठी भाजपचा जाहीरनामा
sakal

बोलून बातमी शोधा

गुवाहाटी - आसाम विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रकाशित करताना (डावीकडून) हिमांता शर्मा, मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि प्रदेशाध्यक्ष रणजीत दास.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी मंगळवारी आसाम विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. राज्य सीमानिश्चितीच्या माध्यमातून जनतेच्या राजकीय हक्कांचे रक्षण करण्याच्या आश्वासनांसह जाहीरनाम्यात दहा प्रमुख आश्वासने देण्यात आली आहेत.

जनतेच्या राजकीय हक्कांचे रक्षण करणार; आसामसाठी भाजपचा जाहीरनामा

sakal_logo
By
पीटीआय

गुवाहाटी - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी मंगळवारी आसाम विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. राज्य सीमानिश्चितीच्या माध्यमातून जनतेच्या राजकीय हक्कांचे रक्षण करण्याच्या आश्वासनांसह जाहीरनाम्यात दहा प्रमुख आश्वासने देण्यात आली आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय नागरिक नोंदणी  पुस्तिका मोहिम राबविण्यात येत आहे. मूळ भारतीय नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करून सर्व बेकायदेशीर स्थलांतरितांची हाकालपट्टी करण्याचा या मोहिमेचा हेतू आहे. त्यासाठी, आसाममध्ये नागरिकांच्या नोंदणीमध्ये दुरुस्ती करण्याचे आश्वासनही या जाहीरनाम्यात दिले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आसामध्ये भाजप सत्तेवर आल्यास प्रत्येक मुलाला विनामूल्य शिक्षण, पूरनियंत्रणासाठी उपाय करणे, आवश्यक वस्तूंबाबत राज्याला स्वावंलबी बनविणे आदी आश्वासनेही या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत. ‘ओरुंडोई’ योजनेतंर्गत महिलांना सध्या ८३० रुपये देण्यात येतात. ही रक्कम तीन हजार रुपये करण्याचे तसेच पात्र रहिवाशांना जमीन अधिकार बहाल करण्याचे आश्वासनही जाहीरनाम्यात आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जाहीरनाम्याचे प्रकाशन केल्यानंतर जे.पी.नड्डा म्हणाले, की योग्य वेळ आल्यावर आसाममध्ये नागरिकत्व सुधारणा कायदाही (सीएए) लागू केला जाईल. मात्र, हा केंद्राचा कायदा असूनही काँग्रेस तो लागू करणार नसल्याचे बोलत आहे. काँग्रेस एकतर अज्ञानी आहे किंवा आसामधील जनतेचा मूर्ख बनवित आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

११ टक्के उमेदवार गुन्हेगार
आसाममधील विधानसभा निवडणुकीच्या येत्या एक एप्रिलला होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील ११ टक्के उमेदवारांनी गुन्हेगारी स्वरुपाचे खटले सुरू आहेत, अशी माहिती दिल्याचे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) अहवालातून उघड झाले आहे. द आसाम इलेक्शन वॉच आणि एडीआरने उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले. एकूण ३४५ उमेदवारांपैकी ३७ जणांविरुद्ध गुन्हेगारी खटले सुरू आहेत. त्याचप्रमाणे, ३० उमेदवारांविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

जाहीरनाम्यातील प्रमुख आश्वासने

  • प्रत्येक मुलाला विनामूल्य शिक्षण
  • पूरनियंत्रणासाठी उपाय करणे.
  • राज्याला स्वावंलबी बनविणे.

Edited By - Prashant Patil

loading image