मी राजा-महाराजा आहे का? मुख्यमंत्र्यांनी कलेक्टरला सुनावलं

मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा यांच्यासाठी स्थानिक प्रशासनाने वाहतूक थांबवली होती.
Himanta Biswa Sarma
Himanta Biswa SarmaTeam eSakal

मंत्री, नेते मंडळी दोऱ्यांमध्ये त्यांच्या भोवती नेहमी सुरक्षा रक्षक, पोलीस आणि कार्यकर्त्यांचा मोठा गराडा पाहायला मिळतो. त्यातच ते जर मुख्यमंत्री असतली तर सुरक्षा यंत्रणांचे प्रोटोकॉल आणि स्थानिक पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने केलेलं वाहतुकीचं नियोजन यामुळे अनेकदा सामान्य नागरिकांना ट्राफिकमध्ये अडकावं लागतं. अशीच एक घटना आसामचे (Assam) मुख्यमंत्री हेमंता शर्मा (CM Himanta Biswa Sarma) यांच्या दौऱ्यामध्ये अशीच एक घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय.

Himanta Biswa Sarma
मुस्लिमांविरोधात चिथावणीखोर भाषण; यती नरसिंहानंद यांना अटक
Himanta Biswa Sarma
अखिलेश यादव यांना व्हर्च्युअल रॅली पडली महाग

हेमंता बिस्वा शर्मा यांचा हा दौरा चर्चेच विषय ठरतोय. याचं कारण म्हणजे आपल्या दौऱ्यादरम्यान, पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक थांबवली आणि स्थानिकांना मोठा त्रास झाला. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर हेमंता बिस्वा सर्मा रागाच्या भरात पोलीस अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं. मी काय राजा महाराजा आहे का? असं म्हणत ते वाहतुक थांबवणाऱ्या पोलिसांना चांगलेच रागावले. त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Himanta Biswa Sarma
एकतर्फी बदल अमान्य : लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे

‘व्हीआयपी कल्चर’ला विरोध करत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्याला फटकारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, मुख्यमंत्री त्यांच्या ताफ्यासोबत जात होते, तेव्हाच त्यांना ट्रॅफिक जाम होताना दिसलं. हे पाहून ते अस्वस्थ झाले आणि खाली उतरले. व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री जिल्हाधिकाऱ्यांना, "डीसी साहेब, हे काय नाटक आहे? गाडी का थांबवली आहे? कोणी राजा-महाराजा येणार आहे का? हे करू नका. लोकांना त्रास होतोय." असं सुनावताना दिसत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com