आसाममधील एनकाउंटरचे सरमांकडून समर्थन

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी पोलिसांकडून होणाऱ्या एनकाउंटरचे परखडपणे समर्थन केले आहे.
Himanta Biswa Sarma
Himanta Biswa SarmaSakal

नवी दिल्ली/गुवाहाटी - आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी पोलिसांकडून (Police) होणाऱ्या एनकाउंटरचे (Encounter) परखडपणे समर्थन केले आहे. सरमा यांनी मे महिन्यात आसामची (Assam) सूत्रे स्वीकारली. तेव्हापासून किमान १२ संशयित घुसखोर आणि आरोपींना गोळ्या घालून ठार मारण्यात आले आहे, तर इतर अनेक जण जखमी झाले आहे. गृह खात्याचा पदभार सरमा यांच्याकडेच आहे. सरमा राजवटीत बंदुकीचा चाप ओढायला मिळाल्याने पोलिस आनंदित झाले आहेत, अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे. यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. (Assam Encounter Support From Himanta Biswa Sarma)

या पार्श्वभूमीवर सरमा यांनी स्पष्ट केले की, पोलिसांच्या ताब्यातील शस्त्रे हिसकावून गुन्हेगार पळून जाण्याच्या प्रयत्नात असतील किंवा कोठडीतून नुसते पलायन करीत असतील तर तर पोलिसांनी गोळीबार करायला हवा. मुख्य म्हणजे गुन्हेगारावर बलात्काराचा आरोप असेल तर, कायद्याने सुद्धा अशा आरोपीच्या छातीवर नाही तरी किमान पायावर गोळी झाडण्याची परवानगी आहेच. संशयित आरोपी किंवा गुन्हेगारांनी आधी गोळीबार केल्यास कायद्याने पोलिसांना गोळीबार करण्याची परवानगी आहे. कायद्याने जे करण्याची परवानगी आहे, ते करण्यापूर्वी आपले काम लोकांच्या भल्याचे आहे आणि स्वतःचा कोणताही हितसंबंध जपण्यासाठी नाही हे आपल्या सद््सद््विवेकबुद्धीनुसार स्पष्ट असले पाहिजे.

Himanta Biswa Sarma
मोदी कॅबिनेटमध्ये OBC, SC आणि युवकांचा वाढणार टक्का?

कुणीतरी मला विचारले की एनकाऊंटरच्या घटनांचा राज्यात पायंडा पडतो आहे का...त्यावर मी उत्तर दिले की, जर एखाद्या गुन्हेगार पोलिस कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असेल तर तसा पायंडा असायला हवा.

- हिमंता बिस्व सरमा, आसामचे मुख्यमंत्री

‘गाय ही आम्हाला देवासारखी‘

सरमा यांनी राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या ऑफिसर इन-चार्जची प्रत्यक्ष बैठक प्रथमच घेतली. त्यावेळी त्यांनी गुरांच्या तस्करीचा मुद्दाही उपस्थित केला. ते म्हणाले की, गुरांच्या संशयित तस्करांविरुद्ध पोलिसांनी तितकेच कठोर असावे. गाईंची तस्करी करणाऱ्यांना कोणतीही किंमत मोजावी लागली तरी पकडले पाहिजे. हे प्रकरण आरोपपत्र दाखल करण्याच्या टप्प्यापर्यंतही जाता कामा नये असेच मला वाटते, कारण गाय आम्हाला देवासारखी आहे. आमच्या गाईंचे रक्षण झाले पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com