खुशखबर! 1 जानेवारीपासून सरकार देणार लग्नात 1 तोळं सोनं

वृत्तसंस्था
Tuesday, 31 December 2019

सरकारने या योजनेसाठी काही अटी लावल्या आहेत. 'अरुंधती स्वर्ण योजना' असे या योजनेचे नाव आहे. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी नवरीच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न पाच लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

नवी दिल्ली : जर तुम्ही नवीन वर्षात लग्न करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक भन्नाट खुशखबर आहे. एक जानेवारीपासून आसाम सरकार कमीत कमी दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या मुलीच्या लग्नात 10 ग्रॅम सोन्याचा आहेर करणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सरकारने या योजनेसाठी काही अटी लावल्या आहेत. 'अरुंधती स्वर्ण योजना' असे या योजनेचे नाव आहे. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी नवरीच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न पाच लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे. तसेच हे मुलीचे पहिलेच लग्न असणे गरजेचे आहे. आसाम सरकारने या योजनेसाठी तीन महिन्यांसाठी 300 कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. 

Image result for gold jewellery for bride

बॅंकेत जमा होणार 30 हजार रुपये
'अरुंधती स्वर्ण योजने अंतर्गत कोणताही फिजिकल फॉर्म जिला जाणार नाही. लग्नाच्या नोंदणी आणि पडताळणीनंतर नवरीच्या बॅंक अकाउंटमध्ये 30 हजार रुपये जमा केले जाणार आहे. त्यानंतर तिला सोने खरेदीची पावती जमा करावी लागणार आहे. या पैशांचा वापर इतर कोणत्याही वस्तू विकत घेण्यासाठी करता येणार नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assam government to gift 10 gram gold to every girl in wedding