आसाममधील 'किसिंग बाबा'ला अटक

वृत्तसंस्था
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

राम प्रकाश चौहान असे संबंधित बाबाचे नाव आहे. 22 ऑगस्टला त्याला भोरालतूप गावातून अटक करण्यात आली. चौहान हा महिलांच्या शारीरिक आणि मानसिक समस्या सोडविण्यासाठी 'चमत्कारी चुंबन' घेतो आणि त्यानंतर संबंधित महिला त्यांच्या समस्यांपासून मुक्त होतात, असा दावा चौहानकडून केला जात आहे.

मोरीगाव : आसाममधील एका 'किसिंग बाबा'ला पोलिसांनी अटक केली. हा बाबा महिलांना मिठी मारत आणि चुंबन घेऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन देत होता. अशा स्वयंघोषित आधात्मिक बाबाला आसामच्या मोरीगाव पोलिसांनी गजाआड केले. 

राम प्रकाश चौहान असे संबंधित बाबाचे नाव आहे. 22 ऑगस्टला त्याला भोरालतूप गावातून अटक करण्यात आली. चौहान हा महिलांच्या शारीरिक आणि मानसिक समस्या सोडविण्यासाठी 'चमत्कारी चुंबन' घेतो आणि त्यानंतर संबंधित महिला त्यांच्या समस्यांपासून मुक्त होतात, असा दावा चौहानकडून केला जात आहे. तसेच त्याने दावा केला, की त्याच्याकडे विष्णू देवाची 'दैवीशक्ती' असून, या दैवीशक्तीद्वारे तो महिलांच्या वैवाहिक समस्या सोडवितो. त्याने त्याच्या घरातच मंदिर स्थापन केले आहे. चौहान गेल्या महिन्यापासून महिलांवर अशा पद्धतीने उपचार करत आहे. मोरीगाव जिल्ह्यातील साक्षरता दर कमी असल्याने येथे जादूटोणासारखे प्रकार सर्रासपणे होत आहेत. 

Web Title: Assam Kissing Baba Who Claimed To Cure Women With Smooches Arrested

टॅग्स