अबब ! उंदरांनी कुरताडल्या तब्बल 12 लाखांच्या नोटा

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 जून 2018

जेव्हा त्यांनी एटीएम मशिन उघडून पाहिले तर त्यांना धक्काच बसला. बँकेच्या कर्मचाऱ्यांना या एटीएम मशिनमध्ये पाचशे आणि दोन हजारांच्या नोटांचे तुकडे दिसले.

तिनसुकिया : कपडे, महत्वाची कागदपत्रे उंदरांनी कुरताडणे असे प्रकार अनेकदा घडत असतात. मात्र, आसामच्या तिनसुकियामध्ये भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये उंदरांनी धुडगूस घातला. या एटीएम मशिनमधील तब्बल 12 लाख 38 हजार रुपयांच्या नोटा उंदरांनी कुरताडल्याचा प्रकार समोर आला.

assam mice chews notes worth rs 12 lakh in atm

तिनसुकियामधील लाईपुली येथील एसबीआयचे एटीएम सेंटर आहे. हे एटीएम सेंटर काही तांत्रिक कारणांमुळे अनेक दिवसांपासून बंद होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर बँकेचे कर्मचारी एटीएम मशिन दुरुस्तीसाठी आले होते. मात्र, जेव्हा त्यांनी एटीएम मशिन उघडून पाहिले तर त्यांना धक्काच बसला. बँकेच्या कर्मचाऱ्यांना या एटीएम मशिनमध्ये पाचशे आणि दोन हजारांच्या नोटांचे तुकडे दिसले.

एटीएम मशिनमध्ये भरलेले आणि रक्कम काढल्याचा तपशील घेतल्यानंतर तब्बल 12 लाख 38 हजार रुपयांच्या नोटा कुरतडल्याचे स्पष्ट झाले. या गंभीर अशा प्रकाराची बँक व्यवस्थापनाकडून तपास करण्यात येत आहे.

Web Title: Assam mice chews notes worth rs 12 lakh in ATM

टॅग्स