आसाममध्ये पाच दहशतवादी पकडले

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

मोरीगाव, (आसाम): तिवा लिबरेशन आर्मी (टीएलए)च्या स्वयंघोषित कमांडरसह पाच दहशतवादी तसेच गारो नॅशनल लिबरेशन आर्मीच्या तीन दहशतवाद्यांना मेघालयातील सलांग भागात काल अटक केली. मोरीगाव जिल्हा पोलिस दल आणि मेघालयाच्या सुरक्षा दलाने काल रात्री संयुक्तरीत्या ही कारवाई केली.

पोलिस सूत्राच्या मते, शस्त्रास्त्राचे प्रशिक्षण घेण्यासाठी दोन दहशतवादी गावात थांबले होते. तसेच टीएलएचा स्वयंघोषित कमांडर मोतीलाल देवरीने तिवा स्वायत्त परिषदेचा मुख्य कार्यकारी सदस्य पबन मंटाकडे 50 लाख रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई सुरू केली होती. अटक केलेल्या पाचही दहशतवाद्यांची ओळख पटली असून, त्यात मोतीलाल देवरी, सौरभ डेका, खसांग ए मारक, स्मार्ट आणि अरविन अशी त्यांची नावे आहेत. आसाम-मेघालयच्या सीमावर्ती भागात दहशतवादी कारवाया सतत सुरू असतात. गेल्यावर्षी भारत-भूतानलगत असलेल्या आसमच्या कोक्राझारमध्ये सुरक्षा दलाच्या चकमकीत एनडीएफबी(एस)चा कुख्यात दहशतवादी मारला गेला.

Web Title: assam news Five terrorists arrested in Assam