आसाम धुमसलं; पोलिसांचा स्थानिकांवर गोळीबार, दोघांचा मृत्यू

assam
assamesakal

आसाम : आसाम (Assam) राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात (Firing) दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर दरांग (Darrang) जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराचा एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. तसंच

पोलिसांचा स्थानिकांवर निःशस्त्र गोळीबार

आसाममधील राज्य सरकारची राज्यात अतिक्रमणाविरोधात मोहिम सुरु आहे. या मोहिमेतंर्गत दरांग जिल्ह्यातील ढालपूर भागात अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली. आज (ता.२४) अवैध अतिक्रमणाविरोधात कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना स्थानिकांनी विरोध केला. हा विरोध पांगवण्यासाठी पोलिसांनी निःशस्त्र स्थानिकांवर गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या या गोळीबारात दोन ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे.

assam
दिल्लीत न्यायालयात गोळीबार, गँगस्टरसह तिघांची हत्या

आसाममध्ये हिंसाचार, अमानवीय वर्तणुक

आसाम राज्यात हिंसाचार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे एका पत्रकाराने अर्धमेल्या अवस्थेतील व्यक्तीला पोलिसांसमोर मारहाण केली. या हिंसाचाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ पोलीस आणि स्थानिक नागरिकांमध्ये हा हिंसाचार झाल्याचं दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारानंतर अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीसोबत अमानवीय वर्तवणूक केल्याचंही दिसून येतंय. या पत्रकाराला पोलिसांनी अटक केली आहे. या हिंसाचारानंतर आसाममधील भाजप सरकार आणि प्रशासन यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

assam
माझी हत्या होऊ शकते, सुरक्षा द्या; ओवैसींचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

काँग्रेसकडून आरोप

या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर हा गोळीबार केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. हा हिंसाचार राज्य सरकारनंच घडवून आणला असल्याचं म्हटलं आहे. आता या हिंसाचाराचे पडसाद उमटल्यानंतर सीआयडी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पत्रकारालाही अटक केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com