
Assam: "बडे पापा म्हणत तरुणीने.." पॉर्न साइटवर स्वतःचा व्हिडीओ पाहताच 78 वर्षीय वृद्धाची आत्महत्या
ज्येष्ठ व्यक्ती हनी ट्रपमध्ये अडकल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. दरम्यान, आसाममध्ये धक्कादायक घटना घडल्याची माहीती समोर आली आहे. पॉर्न साइटवर स्वतःचा व्हिडीओ पाहताच 78 वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बडे पापा म्हणत तरुणीने हनी ट्रपमध्ये 78 वर्षीय वृद्धाला फसवले होते. (Assam72 year old man dies by suicide after intimate video with college girl surfaced online )
आसाममधील जोरहाट जिल्ह्यात एका ७२ वर्षीय व्यक्तीने पॉर्न साइटवर व्हिडिओ पाहिल्यानंतर आत्महत्या केली. त्या व्हिडिओमध्ये हा वृद्ध एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीसोबत सेक्स करताना दाखवण्यात आला होता.या आत्महत्येनंतर गावातील महिलांनी आरोपीच्या अटकेसाठी आंदोलन केले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. Crime News
ही घटना जोरहाट जिल्ह्यातील ढेकेलिया गावामधील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणी वृद्धाला 'बडे पापा' या नावाने बोलवत होती. ती एकटी असताना तिने ७२ वर्षीय व्यक्तीला घरी बोलावले होते, असा आरोप आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, एका सामान्य वृद्ध मुलीच्या बोलण्यात आला होता. तो तिच्या घरी गेला. यानंतर तरुणीने वृध्दाला स्वतःत गुंतवले. या घटनेचा व्हिडिओ केला. Crime News
वृद्धाला नशेच्या गोळ्या दिल्या....
तरुणीने वृद्धाला नशेच्या गोळ्या दिल्या, त्यामुळे त्या वेळी ही घटना मृताच्या लक्षातही आली नसल्याचा दावा ग्रामस्थानी केला आहे. आत्महत्येपूर्वी मृताने आपल्या समस्या गावकऱ्यांना सांगितल्याचा दावा केला जात आहे.
तरुणी आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचे वृद्धाने म्हटले होते. अखेर या वृद्धाचा व्हिडिओ एका पॉर्न साइटवर अपलोड करण्यात आला. या घटनेने त्याला धक्का बसला आणि त्याने आत्महत्या केली. मृत्यूनंतर पोलिसांना वृद्धाच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ मिळाला. Crime News
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ संतप्त झाले असून कारवाईची मागणी करत आंदोलन केले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिस तपासात तरुणीसह अन्य काही लोकांसोबतचे सेक्सचे व्हिडिओही समोर आले आहेत.
महाविद्यालयीन विद्यार्थिनी असलेल्या या तरुणीने तिच्या एका वर्गमित्रसोबत अश्लील व्हिडिओही बनवला होता. यावर मुलीने विद्यार्थिनीवर तिचा व्हिडिओ लीक केल्याचा आरोप केला. Crime News