विधानसभेच्या कौलावर अखिलेश यादव यांची चुटकी

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

पाच राज्यांच्या विधानसभा निवडुकीचे सुरवातीचे कौल समोर आल्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या निकालांच्या कलावर चांगलीच चुटकी घेतली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, जेंव्हा एक एक मिळून अकरा होतात, तेव्हा मोठ-मोठ्या लोकांची सत्ता नौ दो ग्याराह होते.

लखनौ- पाच राज्यांच्या विधानसभा निवडुकीचे सुरवातीचे कौल समोर आल्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या निकालांच्या कलावर चांगलीच चुटकी घेतली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, जेंव्हा एक एक मिळून अकरा होतात, तेव्हा मोठ-मोठ्या लोकांची सत्ता नौ दो ग्याराह होते.

समाजवादी पक्षाने आपले काही उमेदवार या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते आणि त्यांना यशही मिळाले आहे. छत्तीसगड आणि मध्यप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे उमेदवार निवडुण आले आहेत. 

 

दरम्यान, चार वर्षांपूर्वी चौफेर उधळलेल्या भाजपच्या विजयरथाला आज (मंगळवार) धक्का बसला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीनही राज्यांमध्ये भाजपच्या सत्तेला काँग्रेसने जोरदार धक्का दिला आहे. मध्य प्रदेशमध्ये दोन्ही पक्षांमध्ये पारडे समान आहे, तर राजस्थानमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसने पूर्ण वर्चस्व राखत भाजपची सत्ता हिसकावून घेतली.

Web Title: Assembly Election Result 2018 Akhilesh Yadav Statement On Congress Gains In Elections