Atal Bihari Vajpayee : अटलजींच्या अस्थीकलश यात्रेला हजारोंची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

अटलजींचा अस्थी कलश आज हरिद्वारला नेण्यात आला. त्यावेळी यात्रेत लाखो लोक सहभागी झाले होते. कै. वाजपेयी यांनी जे 'अटल' स्थान निर्माण केले त्याचेच ही गर्दी द्योतक होती. 

नवी दिल्ली - सर्वसामान्यांच्या मनता दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्थान किती अढळ आहे, याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली. अटलजींचा अस्थी कलश आज हरिद्वारला नेण्यात आला. त्यावेळी यात्रेत लाखो लोक सहभागी झाले होते. कै. वाजपेयी यांनी जे 'अटल' स्थान निर्माण केले त्याचेच ही गर्दी द्योतक होती. 

आज सकाळी नवी दिल्लीतील स्मृतीस्थळ येथून अटलजींच्या कुटुंबियांनी देशाच्या लाडक्या नेत्याच्या अस्थी गोळा केल्या. अटलजींची मानसकन्या नमिता आणि नात निहारिका यांच्यासह अन्य निकटवर्तीय यावेळी उपस्थित होते. सजवलेल्या रथावरुन या अस्थी हरिद्वारला नेण्यात आल्या. या यात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लोक अस्थीकलशावर पुष्पवृष्टी करत होते. अटलजींच्या अस्थी आज हरिद्वार येथे गंगेत विसर्जन केल्या जाणार आहेत. उत्तर प्रदेशातील सर्व नद्यांमध्ये अटलजींच्या अस्थी विसर्जित केल्या जातील, अशी घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. आज निघालेली अस्थीकलश यात्रा सुमारे दोन किलोमीटर लांब होती.  

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Asthikalas Yatra At New Delhi Of Atal Bihari Vajpayee