Road Accident : रत्यावर उभ्या ट्रकला मिनी ट्रकची धडक; सात जणांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident

Road Accident : रत्यावर उभ्या ट्रकला मिनी ट्रकची धडक; सात जणांचा मृत्यू

Odisha Road Accident : ओडिशाच्या जाजपूरमध्ये भीषण रस्ता अपघात झाला असून, पश्चिम बंगालमधील 7 जणांचा मृत्यू आहे, अशी माहिती जाजपूरचे पोलीस अधीक्षक (एसपी) विनीत अग्रवाल यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार ओडिशाच्या जाजपूर जिल्ह्यात शनिवारी एका मिनी ट्रकने थांबलेल्या ट्रकला धडक मागून दिली. यामध्ये पश्चिम बंगालमधील सात नागरिकांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना कळवण्यात आली असून, सर्व मृत पश्चिम बंगालचे रहिवासी होते. शनिवारी पहाटे कोलकाताहून भुवनेश्वरला पोल्ट्रीचे साहित्य घेण्यासाठी एक मिनी ट्रक निघाला होता.

त्यावेळी महामार्गावरील धुक्यामुळे रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक दिसून आला नाही. त्यात या मिनी ट्रक उभ्या ट्रकला जाऊन धडकला. ही धडक इतकी भीषण होती की, यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर, एकाचा रूग्णलयात नेत असताना वाटेत मृत्यू झाला.