अटलबिहारी वाजपेयी यांना लवकरच 'डिस्चार्ज'

वृत्तसंस्था
बुधवार, 13 जून 2018

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर आहे. वाजपेयी यांना अँटिबायोटिक्‍स दिले जात असून, त्यांची प्रकृती सुधारत आहे. त्यांना लवकरच 'डिस्चार्ज' देण्यात येईल, असे एम्स रुग्णालयाने आज (बुधवार) दुपारी मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले आहे.

नवी दिल्ली- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर आहे. वाजपेयी यांना अँटिबायोटिक्‍स दिले जात असून, त्यांची प्रकृती सुधारत आहे. त्यांना लवकरच 'डिस्चार्ज' देण्यात येईल, असे एम्स रुग्णालयाने आज (बुधवार) दुपारी मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले आहे. 

वाजपेयी यांच्या काही तपासण्या केल्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागातून जनरल विभागात हलविण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार वाजपेयी हे उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. 93 वर्षीय वाजपेयी यांना सोमवारी एम्स रुग्णालयात रुटीन चेकअपसाठी दाखल करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी एम्समध्ये जाऊन वाजपेयी यांच्या तब्येतीची आणि उपचाराची विचारपूस केली आहे. 

Web Title: Atal Bihari Vajpayee to be discharged soon