वाजपेयींच्या कुटुंबावर आली रिक्षाने प्रवास करण्याची वेळ

atal bihari vajpayee family travelled in auto rikshaw at Gwalior
atal bihari vajpayee family travelled in auto rikshaw at Gwalior

ग्वालियर (मध्य प्रदेश): दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कुटुंबियांवर रिक्षाने प्रवास करण्याची वेळ आली आहे. कुटुंब रिक्षात बसतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर व व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

ग्वालियरमध्ये वाजपेयी यांच्या अस्थीचे विसर्जन करण्यासाठी त्यांचे कुटुंबिय आले होते. अस्थी विसर्जनसाठी वाजपेयी यांचे कुटुंब पोहोचले होते. मात्र, त्यांच्यासाठी घरी परतताना गाडीची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे कुटुंबाला रस्त्यावर रिक्षाची वाट पाहत उभे राहावे लागले. खूप वेळाने रिक्षा मिळाल्यानंतर ते घरी पोहोचू शकले. रिक्षात बसतानाचे छायाचित्र व व्हिडिओ व्हायरल झाले असून, भारतरत्न आणि दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कुटुंबाला अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया नेटिझन्स व्यक्त करत आहेत.

वाजपेयी यांचे ग्लावियरमध्ये जुने घर असून तिथे त्यांची भाची कांती मिश्रा, त्यांचे पती ओपी मिश्रा आणि मुलगी कविता यांच्यासहित इतर नातेवाईक राहतात.  'वाजपेयी यांच्या अस्थीचे विसर्जन करण्यासाठी आम्ही आलो होतो. जे चारचाकीवाले होते ते आपापल्या गाडीने पोहोचले. आम्ही रिक्षावाले असल्याने रिक्षाने आलो. अस्थी विसर्जन करून झाल्यानंतर रिक्षाची वाट पहात होतो,' असे वाजपेयी यांची भाची कांती मिश्रा यांनी खंत व्यक्त करताना सांगितले.

मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या सरकारने फुलबाग मैदान येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. या सभेसाठी वाजपेयी यांच्या कुटुंबियांना आमंत्रित करण्यात आले होते. मुख्यमंत्री शिवराज सिंह हे विमानतळावरुन थेट कार्यक्रमात पोहोचले होते. अस्थी विसर्जन झाल्यानंतर ते वाजपेयींच्या घरी पोहोचले होते. मात्र घरात कोणीच उपस्थित नव्हते. कारण त्यावेळी सर्व कुटुंबीय घरी परतण्यासाठी रिक्षाची वाट पाहत रस्त्यावर उभे होते. त्यांच्या कुटुंबियांची सरकारच्या वतीने कोणतीच व्यवस्था करण्यात आली नव्हती. कुटुंबीयांचा रस्त्यावर उभे असतानाचे छायाचित्र व व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com