एटीएमच्या रांगेत खातेधारकाचा मृत्यू

यूएनआय
रविवार, 4 डिसेंबर 2016

कोलकता - नोटाबंदीनंतर सुरू असलेले सर्वसामान्यांचे हाल अजूनही थांबलेले नाहीत. एटीएममधून पैसे काढण्यासाठी उभे असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा हदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. ही घटना हुगळी जिल्ह्यातील बांदेल स्थानकानजीकच्या एसबीआयच्या एटीएममध्ये घडली. कलोल रॉय चौधरी असे त्या ज्येष्ठाचे नाव आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून माहिती दिली असून नोटाबंदीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

घराजवळच असलेल्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी चौधरी गेले होते. चौधरी रांगेत उभे असतानाच अचानक कोसळले, असे बॅनर्जी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चौधरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. बॅनर्जी यांनी म्हटले, की अशा प्रकारच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटना सुरूच आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये नोटा काढताना झालेल्या अशा दुर्दैवी घटनांची माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर दिली. बिजॉन मुखर्जी (वय 73, रा. मचलंदापूर, जि. उत्तर परगणा) यांना एटीएमच्या रांगेत हृदयविकाराचा झटका आला होता. तसेच विश्‍वास नासकर (वय 79) या माजी शिक्षकाचा यूबीआयच्या शाखेत असताना हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला. ही घटना दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील रैदहिगी येथे घडली. देशात अशा प्रकारच्या 84 घटना घडल्या असून, मोदी बाबू यांना आणखी किती घटना हव्या आहेत, असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

Web Title: ATM account holder's death in row