एटीएममधूनच आली दोन हजारची बनावट नोट

वृत्तसंस्था
बुधवार, 14 डिसेंबर 2016

पाटणा (बिहार)- स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) एटीएममधून दोन हजार रुपयांची बनावट नोट मिळाल्याची तक्रार एका शेतकऱयाने केली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (बुधवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पंकज कुमार (वय 42) या शेतकऱयाने सिम्रा गावात असलेल्या 'एसबीआय'च्या एटीएम मधून पैसे काढले. यावेळी त्यांना दोन हजार रुपयांची बनावट नोट मिळाली. संबंधित नोट बनावट असून, फोटोकॉपी सारखी दिसत आहे. याबद्दलची तक्रार त्यांनी दाखल केली आहे. याबद्दल 'एसबीआय'च्या व्यवस्थापकांशी संपर्क साधण्यात आला असून, याबाबत पुढील तपास सुरू आहे.'

सिम्रा या गावात असलेल्या 'एसबीआय'च्या एटीएममध्ये 14 लाख रुपयांची रक्कम भरण्यात आली होती. एटीएममध्ये रक्कम भरण्याचे काम खासगी कंपनीला देण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: ATM dispenses ‘fake’ Rs 2,000 note