गुजरातेत दलित दांपत्याला मारहाण; पतीचा मृत्यू

वृत्तसंस्था
सोमवार, 21 मे 2018

राजकोट : गुजरात मधील राजकोटमध्ये एका दलित व्यक्तीला दोरीने बांधून क्रुरपणे केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. यामध्ये त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटो पार्ट्स फॅक्टरी मालकाच्या सांगण्यावरून मृत व्यक्तीला मारहाण करण्यात आली. मुकेश वानिया असे मृत व्यक्तीचे नाव असून. त्याला दोरीने बांधून मारणाऱ्या तीन व्यक्तींचा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये वायरल झाला आहे. 

या प्रकरणी कारखान्याच्या मालकासह पाच जणांना अटक केली असून, आरोपींवर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानूसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर खूनाचा खटलाही दाखल करण्यात आला असल्याची माहिती राजकोटच्या वरिष्ठ पोलिस अधिकारी श्रुती मेहता यांनी दिली.

रविवारी सकळी मुकेश वानिया आणि त्यांची पत्नी भंगार गोळा करण्यासाठी कारखान्याच्या आवारात गेले होते. कारखान्यातील कामगारांनी त्यांना चोर समजून पकडले. त्यांना दोरीने बांधून मारहाण केली. यात वानिया यांच्या पत्नीने तिथून पळ काढला आणि मदत मागण्यासाठी जवळील गावात गेली. तीने काही लोकांना गोळा करून आणले असता, वानिया जमिनीवर पडलेले आढळून आले. त्यांना त्वरीत रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

गुजरातेत दलित सुरक्षित नाहीत
"राजकोट येथील कारखाना मालकाच्या आदेशावरून एका अनुसूचित जातीच्या व्यक्तीला मारहाण करून त्याचा खून करण्यात आला. त्याच्या पत्नीला मारण्यात आले आहे. असून गुजरात दलितांसाठी सुरक्षित नसल्याचे'' ट्विट आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केले आहे. 

हा प्रकार 2016 उणा हल्ल्यापेक्षा अधिक भयानक असून, उणा मध्ये गायीचे कातडी काढण्याच्या कारणावरून चार दलितांना गाडीला बांधून अमानवी पद्धतीने मारण्यात आले होते. या हिंसाचारत एकाला जिव गमवावा लागला होता. गुजरात मध्ये होणाऱ्या या जातीय हिंसाचाराचा गुजरात सरकारने काहीही धडा घेतलेला नाही. गुजरात सरकार मागील चुकांमधून काहीही शिकायला तयार नाही. अशी पोस्ट मेवानी यांनी फेसबुकवर टाकली आहे.  

Web Title: attack on dalit in gujarat