पुलवामा हल्ला म्हणजे बाबरी मशीदचा बदला; काश्मिरी विद्यार्थी ताब्यात

crime
crimecrime

पुलवामा हल्ल्याच्या (Attack on Pulwama) तिसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी काश्मीरी वंशाच्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीमच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन विद्यार्थ्याने व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामवर पुलवामा हल्ल्याचे वर्णन बाबरी मशीद पाडल्याचा बदला म्हणून केले होते.

नीमचचे पोलिस कॅप्टन सूरज कुमार वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय विद्यार्थी येथील सरकारी महाविद्यालयात बीकॉमचा विद्यार्थी आहे. काश्मिरी विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीअंतर्गत त्यांनी येथे प्रवेश घेतला आहे. विद्यार्थ्याने इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर पुलवामा हल्ल्याचा (Pulwama) फोटो पोस्ट केला होता. बाबरी मशीद (Babri Masjid) पाडल्याचा हा बदला असल्याचा दावा त्यांनी तेथे केला. यानंतर कॉलेज प्रशासनाने याची माहिती पोलिसांना दिली.

crime
शेजारी महिलेने धरला अबोला; रागाच्या भरात इसमाने केला चाकू हल्ला

पोलिस कॅप्टननुसार, विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. त्याचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करून प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आम्ही त्याची चौकशी करीत आहोत. त्याच्याकडे व्हिडिओ आणि फोटो कोठून आले याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

काही विद्यार्थ्यांनी त्यांना या विद्यार्थ्याच्या कृत्याची माहिती दिली होती. आम्ही तपासले असता प्रकरण बरोबर निघाले आणि त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. हा विद्यार्थी कॉलेजच्या वसतिगृहात राहतो, असे शाळेचे मुख्याध्यापक व्हीके जैन यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com