केरळमध्ये संघ कार्यालयावर हल्ला; चार जखमी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 मार्च 2017

कालिकत - नादापुरमजवळील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर शुक्रवारी रात्री अज्ञात व्यक्तींना बॉम्ब हल्ला केला. या घटनेत संघाचे चार स्वयंसेवक जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

कालिकत - नादापुरमजवळील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर शुक्रवारी रात्री अज्ञात व्यक्तींना बॉम्ब हल्ला केला. या घटनेत संघाचे चार स्वयंसेवक जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नादापुरमजवळील कल्लाची येथील संघाच्या कार्यालयावर गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी क्रूड बॉम्बचा हल्ला केला. या हल्ल्यात बाबू, विनिष, सुधीर आणि सुनील हे चार स्वयंसेवक जखमी झाले. जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यामागच्या नेमक्‍या उद्देशाचा पोलिस शोध घेत आहेत. मार्क्‍सवाद्यांच्या अत्याचाराविरुद्ध संघाने केलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलनाचे प्रमुख कुंदन चंद्रावत यांनी केरळमधील मुख्यमंत्र्यांचे मारून त्यांचे शीर आणणाऱ्यास एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. या घोषणेनंतर काही वेळातच संघाच्या कार्यालयात हल्ला झाला आहे. दरम्यान, संघ कोणत्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन करत नसल्याचे म्हणत संघाने चंद्रावत यांच्या वक्तव्याला समर्थन नसल्याचे स्पष्ट केले आहे.

"केरळमध्ये कम्युनिस्ट सरकार आल्यापासून गेल्या आठ महिन्यांपासून संघावर सातत्याने हल्ले होत आहेत. केंद्र सरकारने या प्रकरणात लक्ष घालून परिस्थिती पूर्ववत करावी', अशी मागणी संघाचे स्वयंसेवक विराग पाचपोर यांनी केली आहे.

चंद्रावत यांच्या वक्तव्यावरून देशभरातून संघावर टीका करण्यात येत आहे. ब्रिटिशांप्रमाणेच संघाचेही फोडा आणि राज्य करा, हे धोरण असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

Web Title: Attack on RSS office Kerala