‘हाऊ टू प्रॉफिट फ्रॉम टेक्‍निकल ॲनालिसिस’ 

अतुल सुळे 
Monday, 25 January 2021

राजीव खाटलावाला यांचे ‘हाऊ टू प्रॉफिट फ्रॉम टेक्‍निकल ॲनालिसिस’ हे पुस्तक तांत्रिक विश्लेषण शिकू इच्छिणाऱ्यांसाठी खूपच उपयुक्त ठरेल.खाटलावाला हे सीए, कॉस्ट अकाउंटंट असून, त्यांची ॲडव्हायसरी फर्म आहे.

शेअर बाजारातून पैसा कमवायचा असेल तर बाजाराचा आणि कंपन्यांचा अभ्यास व विश्लेषण करावे लागते. तुम्हाला दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची असेल, तर कंपन्यांचे बॅलन्स शीट, नफा-तोटा पत्रक, ‘रेशो’चा अभ्यास करावा लागतो; ज्याला मूलभूत विश्लेषण असे म्हणतात. याउलट तुम्हाला अल्पावधीत खरेदी-विक्री करून फायदा करून घ्यायचा असेल, तर तुम्हाला तांत्रिक विश्लेषण येणे आवश्यक असते. राजीव खाटलावाला यांचे ‘हाऊ टू प्रॉफिट फ्रॉम टेक्‍निकल ॲनालिसिस’ हे पुस्तक तांत्रिक विश्लेषण शिकू इच्छिणाऱ्यांसाठी खूपच उपयुक्त ठरेल. खाटलावाला हे सीए, कॉस्ट अकाउंटंट असून, त्यांची ॲडव्हायसरी फर्म आहे. तसेच ते ‘ट्रेडर्स’साठी कार्यशाळा सुद्धा आयोजित करतात. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या पुस्तकातून वाचकांना खालील गोष्टी शिकता येतील - 
१. तांत्रिक विश्लेषण म्हणजे नक्की काय? 
२. मार्केटचा आणि शेअरचा सध्याचा ट्रेंड कसा ओळखायचा? 
३. वेगवेगळे ‘प्राईस पॅटर्न’कसे ओळखायचे? 
४. मूव्हिंग ॲव्हरेज, बोलिंजर बँड, फिबोनाकी आकडे यांचा उपयोग खरेदी-विक्रीसाठी कसा करावा? 
५. एमएसीडी, आरएसआय आदी इंडिकेटरचा अर्थ कसा लावायचा? 
६. दीर्घ मुदतीची गुंतवणूक करताना सुद्धा तांत्रिक विश्लेषणाचा कसा उपयोग करून घ्यायचा? 

या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे लेखकाने शंभरपेक्षा अधिक भारतीय कंपन्यांच्या चार्टसच्या आधारे तांत्रिक विश्लेषणातील संकल्पना सुस्पष्ट करून सांगितल्या आहेत. तांत्रिक विश्लेषण आत्मसात करू इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: atul sule writes article about book How to profit from technical analysis