बिहारमधून तीन नक्षलवाद्यांना अटक

पीटीआय
सोमवार, 31 जुलै 2017

औरंगाबाद - केंद्रीय राखीव पोलिस दल आणि पोलिस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातून तीन नक्षलवाद्यांना अटक केली. येत्या तीन ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या बिहार बंदचे पोस्टर तीन नक्षलवादी चिकटवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर केंद्रीय राखीव पोलिस दल आणि स्थानिक पोलिसांनी जिल्ह्यातील सहजपूर आणि कलिडी गावात छापे टाकून ही कारवाई केली, अशी माहिती पोलिस अधीक्षक सत्यप्रकाश यांनी दिली.

रामलगनसिंह भोक्ता, कमलेशसिंह भोक्ता आणि महेश भूपिआ अशी अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत, पोलिस अधीक्षकांनी सांगितले. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हा छापा टाकल्याचे त्यांनी सांगितले. अटक करण्यात आलेले सर्व जण हे विविध नक्षलवादी कारवायांत सहभागी होते. त्यातील कमलेशसिंह भोक्ता हा नुकताच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता, असे ते म्हणाले.

Web Title: aurangabad marathwada news three naxalite arrested