प्लास्टिकचा वापर टाळत कुटुंबाचा नवा आदर्श

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 जून 2018

दंतेवाडा : पर्यावरण दिनानिमित्त छत्तीसडमधील दंतेवाडा भागातील कुटुंबाने प्लास्टिकचा वापर बंद करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. इतरांनाही प्लास्टिकचा वापर करू नये यासाठी ते अनेकांना प्रोत्साहन देत आहेत. दंतेवाडातील महेंद्र भारद्वाज यांचे कुटुंबाने मागील चार वर्षापासून प्लास्टिकच्या वस्तू, पिशव्या वापरणे पुर्ण बंद केले आहे.

घरासमोर असलेला नाला प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे तुंबूत असल्याने भारद्वाज यांना अनेकदा साफ करावा लागत असे. यामुळे त्रस्त झालेले महेंद्र भारद्वाज यांनी या प्लास्टिक पिशव्यांमुळे होणाऱ्या हानीची अधिक माहिती घेतली. तेव्हा पाल्स्टिक पिशव्या केवळ नाला तुंबवत नाहीत तर यामुळे निसर्गाची मोठी हाणी होत असून, प्रदुषणात देखील वाढ होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हापासून भारद्वाज कुटुंबाने प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचा निर्धार केला. 

या विषयी भारद्वाज म्हणाले, "चार वर्षापूर्वी पावसाळ्यात जेव्हा नाला प्लास्टिकमुळे तुंबला होता. ते दृष्य पाहून आम्ही हा निर्णय घेतला. प्लास्टिकचा वापर बंद करण्याच्या सुरूवातीच्या काळात आम्हाला खुप त्रास झाला. भाज्या, फळे, दुघ अशा गोष्टी आणण्यासाठी आम्ही अनेकदा प्लास्टिकवरचं अवलंबून होते. त्यानंतर आम्ही याला पर्याय म्हणून ज्यूटच्या पिशव्या वापरू लागलो. तर दुधा सारख्या द्रव पदार्थासाठी आम्ही स्टिलची भांडी घेऊन जातो." 

संयुक्त राष्ट्रसंघाने पर्यावरणाचे महत्त्व ओळखून याला जागतिक पातळीवर घेऊन जाण्यासाठी 1974 पहिल्यांदा सुरूवात केली. तेव्हापासून जगभरातील 100 देश हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतात. 

सध्या भारद्वाज आपल्या सहकारी, मित्रवर्गात याविषयी जनजागृती करीत आहेत. त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचार्यांपैकी 6 ते 7 जणांनी प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद केला आहे. प्लास्टिक हे पर्यावरणामध्ये अनेकप्रकारे बाधा आणत असते. याचे मानवी शरीरावर देखील विपरीत परिणाम होतात. 

Web Title: Avoiding the use of Plastics, the new model of the family