सर्वांत तरुण वैमानिक बनून निर्माण केला आदर्श;आयेशाची काश्मिरी कन्यांना प्रेरणा

Ayesha Aziz India Youngest Female Pilot
Ayesha Aziz India Youngest Female Pilot

श्रीनगर - देशातील महिला आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. अनेक क्षेत्रात महिला वर्गाने आघाडी घेतली असून संरक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. स्वत:ची क्षमता आणि अस्तित्व सिद्ध करण्याच्या इराद्याने महिला सतत सक्रिय राहत आहेत. अशाच ध्येयाने भारावलेली आयेशा अझीज या काश्मिरी युवतीने देशातील सर्वात कमी वयाची महिला वैमानिक होण्याचा मान पटकावला. तिने अनेकांना प्रेरणा दिली असून ती आता काश्मिरी महिलांचे सशक्तीकरणाची प्रतीक बनली आहे. 

आयेशा अझीजने २०११ मध्ये अवघ्या १५ व्या वर्षी परवाना मिळवल्यानंतर सर्वात कमी वयाची विद्यार्थीनी वैमानिक बनली. तिने पुढच्याच वर्षी रशियाच्या सोकोल एअरबेस येथे मिग-२९ जेट उडविण्याचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने बॉम्बे फ्लाइंग क्लबमधून पदवी प्राप्त केल्यानंतर २०१७ मध्ये व्यावसायिक वैमानिक म्हणून परवाना मिळवला. २५ वर्षाची आयेशा म्हणते, गेल्या काही वर्षात काश्मिरी महिलांनी प्रगती केली असून शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी केली आहे. हवाई प्रवास करणे आणि लोकांनी संवाद साधणे आपल्याला आवडते. या आकर्षणापोटीच आपण वैमानिक झालो, असे तिने नमूद केले. वैमानिक होण्यासाठी मानसिकदृष्ट्या खंबीर होणे आवश्‍यक आहे. 

मानसिक स्थिती मजबूत असावी
वैमानिक होण्यासाठी मानसिकदृष्ट्या खंबीर असणे गरजेचे आहे. कारण आपण २०० लोकांना घेऊन जातो आणि ती एक मोठी जबाबदारी असते. पालकांनी प्रोत्साहन दिल्याबद्दल तिने  आभार मानले. स्वप्नपूर्ती करण्यासाठी पालकांनी साथ दिली. त्यांच्याशिवाय आपण ध्येय गाठू शकलो नसतो. माझे वडील माझे आदर्श आहेत. मी सतत वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर विकासाच्या प्रतीक्षेत असते.

२०० तासांचा अनुभव
आयेशाला एकल इंजिनचे सेसना १५२ आणि १७२ विमान उडवण्याचा अनुभव आहे. २०० तासाचे उड्डाण पूर्ण केल्यानंतर तिला व्यावसायिक वैमानिकाचा परवाना देण्यात आला. भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना ती आदर्श मानते. आपल्या यशाचे श्रेय तिने आई-वडिलांना दिले आहे. 

डेस्क जॉब नको होता
लहानपणापासूनच मला प्रवास करण्याची आवड होती. विशेष म्हणजे हवाई प्रवासाबाबत मी खूपच उत्सुक असायचे. प्रवासादरम्यान एखाद्या व्यक्तीला किती जण भेटतात. या कारणांमुळेच वैमानिक होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय आव्हानात्मक होता. कारण तो ९ ते ५ असा डेस्कजॉब नाही. मला नवीन ठिकाणी जाणे, वातावरणात बदलाचा सामना करणे आणि नवीन लोकांना भेटणे यासाठी सतत सज्ज राहावे लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com