
आपली पिढी भाग्यवान आहे, कारण आपण राम मंदिराच्या बांधकामाच्या प्रारंभाचे साक्षीदार बनलो आहोत. पाचशे वर्षांच्या संघर्षात अनेक संत या क्षणाचे स्वप्न पाहात हे जग सोडून गेले.
अयोध्या - अयोध्या हे वैदिक रामायणाचे शहर म्हणून विकसित करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून हे सर्वांत सुंदर शहर ठरेल, असे उद्गार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काढले.
चौथ्या दीपोत्सवानिमित्त आयोजीत कार्यक्रमात त्यांनी मोदी यांच्या नेतृत्वावर तसेच त्यांनी सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांवरही कौतुकाचा वर्षाव केला. या कार्यक्रमातून राजकीय उद्देश साध्य करण्याची संधी त्यांनी दवडली नाही.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
ते म्हणाले की, आपली पिढी भाग्यवान आहे, कारण आपण राम मंदिराच्या बांधकामाच्या प्रारंभाचे साक्षीदार बनलो आहोत. पाचशे वर्षांच्या संघर्षात अनेक संत या क्षणाचे स्वप्न पाहात हे जग सोडून गेले. रामराज्याची मूल्यांची अंमलबजावणी केल्याबद्दल मी मोदी यांचे अभिनंदन करतो. मी येथे विकास कामांसाठी यायचो तेव्हा भेटणारे रहिवासी मला म्हणायचे की, योगीजी राम मंदीराची निर्मिती करा. मी त्यांना सांगायचो की तुम्ही मोदीजींवर विश्वास ठेवा. ते स्वतः मंदिर निर्मितीचे उद्घाटन करण्यासाठी आले.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मोदी यांच्या आयुष्मान भारत, मोफत सिलींडर, वीजजोडणी, गरिबांसाठी शौचालये, अशा योजनांमुळे विकासाचा मार्ग दिसला आहे, असेही योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरिया, थायलंड, नेपाळ, जपान आणि फिजी अशा देशांचे पूर्वी अयोध्येशी संदर्भ होते, पण त्याच्याशी नाते जोडण्याचा आधुनिक मार्ग दीपोत्सवाने दाखविला आहे.
- योगी आदित्यनाथ