राम मंदिर बांधायला सुरवात करा, अन्यथा... : आचार्य सत्येंद्र दास

वृत्तसंस्था
बुधवार, 6 जून 2018

राम मंदिराच्या मुद्यावर भाजप उत्तर प्रदेशातील निवडणूक जिंकले व त्यानंतर सोयीस्कररित्या राम मंदिराचा मुद्दा ते विसरून गेले आहेत. जर राम मंदिर बांधण्यास सुरवात केली नाही तर, 2019 ची निवडणूक श्रीरामाच्या शापामुळे ते हारतील व त्यांना चांगलाच धडा मिळेल.

- आचार्य सत्येंद्र दास महाराज

उत्तर प्रदेश : 'भारतीय जनता पक्षाने आयोध्येतील राम मंदिर बांधण्यास सुरवात केली नाही, तर भाजप 2019 ची निवडणूक नक्कीच हारतील', असे धक्कादायक वक्तव्य आयोध्याचे प्रमुख धर्मगुरू आचार्य सत्येंद्र दास महाराज यांना केले आहे. 

'राम मंदिराच्या मुद्यावर भाजप उत्तर प्रदेशातील निवडणूक जिंकले व त्यानंतर सोयीस्कररित्या राम मंदिराचा मुद्दा ते विसरून गेले आहेत. जर राम मंदिर बांधण्यास सुरवात केली नाही तर, 2019 ची निवडणूक श्रीरामाच्या शापामुळे ते हारतील व त्यांना चांगलाच धडा मिळेल. जर भाजपला 2019 ची निवडणूक जिंकायची असेल, तर त्यांनी आताच राम मंदिर बांधायला घ्यावे, नाहीतर पुढे अवघड होईल.' असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

'जोपर्यंत भाजप राम मंदिर उभारण्यास सुरवात करत नाही, तोपर्यंत रामाचे आशीर्वाद त्यांना मिळणार नाहीत. तसेच पोटनिवडणूकीतील झालेल्या पराभवापासून त्यांनी काहीतरी शिकावे. जर 2019 मध्ये पुन्हा सत्तेत यायचे असल्यास, भाजपने आताच सावध पवित्रा घेऊन राम मंदिर बांधण्यास सुरवात करावी' अशी सूचना आचार्य यांनी दिली.  

'2019 ची निवडणूक ही केवळ विकासाच्या मुद्यावर लढवली जाईल' असे वक्तव्य भाजपचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केले होते. यावर प्रतिक्रीया देताना आयोध्याचे महंत परमहंस दास यांनीही हाच मुद्दा पुढे करत सांगितले की, 'भाजपला 2019 मध्ये सत्तेत यायचे असल्यास राम मंदिर बांधण्यास सुरवात करावी लागेल, नाहीतर आम्ही आमची पावले उचलू.'
 

Web Title: Ayodhya priest reminds BJP to built ram temple otherwise bjp lost 2019 elections