राम मंदिर नको असणाऱ्यांनी पाकिस्तानात निघून जावे : रिझवी

वृत्तसंस्था
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

अयोध्या: अयोध्येत राममंदिर नको असणाऱ्या मुस्लिमांनी पाकिस्तान, बांगलादेशात जावे, असे शिया वक्‍फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयात येत्या 8 फेब्रुवारीपासून बाबरी मशीद प्रकरणावर दररोज सुनावणी होणार आहे.

अयोध्या: अयोध्येत राममंदिर नको असणाऱ्या मुस्लिमांनी पाकिस्तान, बांगलादेशात जावे, असे शिया वक्‍फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयात येत्या 8 फेब्रुवारीपासून बाबरी मशीद प्रकरणावर दररोज सुनावणी होणार आहे.

रिझवी यांनी शुक्रवारी अयोध्येतील वादग्रस्त ठिकाणी नमाज पठण केले आणि राम जन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांची भेट घेतली. या वेळी ते म्हणाले, की जे राम मंदिराला विरोध करत आहेत आणि ज्यांना बाबरी मशीद हवी आहे, अशा कट्टर मानसिकतेच्या मंडळींनी पाकिस्तान किंवा बांगलादेशात जावे. अशा मुस्लिमांना भारतात कोणतेही स्थान नाही. "जिहाद' पसरविणाऱ्यांनी भारतातून नक्कीच निघून जायला हवे आणि त्यांनी इसिसचा प्रमुख अबू बकर अल बगदादीच्या गटात सहभागी व्हावे.

कट्टरपंथीय मुस्लिम मौलवी हे देशाचे विभाजन करू इच्छितात आणि त्यांनी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात निघून जावे. दरम्यान, रिझवी यांच्या वक्तव्यावर शिया धर्मगुरूंनी संताप व्यक्त केला आहे. जातीय तेढ निर्माण करण्याच्या आरोपावरून त्यांना अटक करावी, अशीही मागणी केली आहे. शिया उलेमा कौन्सिलचे अध्यक्ष इफ्तेखार हुसेन इन्कलाबी यांनी रिझवी यांच्यावर टीका करत म्हटले, की ते गुन्हेगार असून, त्यांनी वक्‍फ बोर्डाच्या मालमत्तेवर बेकायदा कब्जा केला आहे आणि गैरमार्गाने विक्री केली आहे. सीबीआयने रिझवी यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले असून कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी अशा प्रकारचे नाटक करत असल्याचा आरोपही इन्कलाबी यांनी केला आहे.

Web Title: ayodhya ram mandir pakistan wasim rizvi