esakal | लोखंड आणि स्टीलच्या वापराशिवाय उभारणार राम मंदिर
sakal

बोलून बातमी शोधा

RAM MANDIR

राम मंदिराचे भूमी पूजन 5 ऑगस्टला होणार आहे. नियोजित कार्यक्रमानुसार भूमी पूजन समारंभ झाल्यानंतर बांधकाम सुरू होईल. भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

लोखंड आणि स्टीलच्या वापराशिवाय उभारणार राम मंदिर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अयोध्या - अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामासाठी मुहुर्त ठरला असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. भव्य अशा मंदिराचे बांधकाम केवळ दगडांमध्ये केलं जाणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. मंदिराच्या वर्कशॉपचे सुपरवायझर अनुभाई सोमपुरा यांनी म्हटलं की, मंदिराच्या निर्मितीसाठी अनोखं तंत्रज्ञान आणि मशिन्सचा वापर केला जाईल.

गेल्या तीस वर्षांपासून अनुभाई सोमपुरा हे मंदिराच्या वर्कशॉपचे सुपरवायझर म्हणून काम पाहतात. या ठिकाणी मोठ्या संख्येनं मंदिरासाठी दगड ठेवले आहेत. याशिवाय राजस्थानातूनही दगड मागवण्यात आले आहेत. सोमपुरा यांनी सांगितलं की, राजस्थानामधून आणलेले दगड इथं घडवले जातील.

मंदिराच्या बांधकामासाठी दगडांसह कॉपर, लाकूड आणि व्हाइट सिमेंटचा वापर केला जाईल. राजस्थानातून येणारे दगड घडवण्यासाठी इथं खास मशिन्स लावण्यात आले आहेत. हे सर्व काम भूमीपूजन झाल्यानंतर सुरु करण्यात येणार आहे.  हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी सांगितलं की, ट्रस्टच्या सदस्यांनी निश्चित केलं आहे की मंदिराची निर्मिती फक्त दगडांपासून होईल. यामुळे मंदिर जास्त काळ टिकेल. मंदिराच्या पायाभरणीवेळी लोकांकडून दान करण्यात येणारं सोनं, चांदी आणि कॉपर यांचा वापर केला जाईल.

हे वाचा - भारताने पुन्हा दिला चीनला झटका; 47 चिनी अ‍ॅप्सवर बंदी

राम मंदिराचे भूमी पूजन 5 ऑगस्टला होणार आहे. नियोजित कार्यक्रमानुसार भूमी पूजन समारंभ झाल्यानंतर बांधकाम सुरू होईल. भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. या खास कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहतील.

हे वाचा - चीनला रोखण्यासाठी भारताने सीमारेषेवर तैनात केला T-90 टँकचा ताफा

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून या कार्यक्रमासाठी विशेष तयारी सुरू असून या कार्यक्रमाचं अयोध्येतून थेट प्रक्षेपण डीडी नॅशनल वृत्तवाहिनीवरून केलं जाणार आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाविषयी ट्विट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र ज्या दिवशी राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्येत असतील, तो स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण असेल. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरून केलं जाणार आहे. त्याचबरोबर इतर वाहिन्याही कार्यक्रमाचं प्रक्षेपण करणार आहेत, असं श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं म्हटलं आहे.

loading image