भक्तीमय वातावरणात आदित्य ठाकरेंनी 'शरयू' किनारी केली महाआरती

आदित्य ठाकरे सध्या अयोध्येच्या दौऱ्यावर असून दिवसभरात त्यांच्या विविध कार्यक्रम पार पडले.
Aditya Thackeray_Ayodhya rally
Aditya Thackeray_Ayodhya rally

अयोध्या : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नुकतीच शरयू नदीची महाआरती पार पडली. यावेळी ते भक्तीभावात तल्लीन झालेले पहायला मिळाले. यावेळी शरयू काठ आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलं होतं. या तयारीसाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक आधीच अयोध्येत पोहोचले होते. (Ayodhya tour Aditya Thackeray performed Mahaarati on the banks of river Sharu)

Aditya Thackeray_Ayodhya rally
राष्ट्रपतीपदासाठी विरोधीपक्षांचा असेल एकच उमेदवार, पवारांनंतर नव्या नावाची चर्चा

आदित्य ठाकरे अयोध्येत पोहोचल्यानंतर त्यांनी प्रथम इस्कॉन मंदिराला भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी हनुमान गढी इथं जाऊन हनुमानाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी रामलल्लाचं दर्शन घेतलं आणि पुढे शरयू नदीकाठी जाऊन महाआरती केली.

Aditya Thackeray_Ayodhya rally
मुंबई महापालिकेत रामराज्य आणण्याचा प्रयत्न करणार - आदित्य ठाकरे

शरयू किनारी सुरुवातीला कलश पूजनानंतर शरयू नदीची महाआरती पार पडली. या कार्यक्रमासाठी नदी किनारी फुलांची आकर्षक सजावट, विद्युतरोषणाई आणि इतर सर्व पुजेची तयारी करण्यात आली. या तयारीच्या कामासाठी चार ते पाच दिवसांपासूनच नाशिकमधील शिवसैनिक अयोध्येला रवाना झाले होते.

Aditya Thackeray_Ayodhya rally
अयोध्येत उभारणार 'महाराष्ट्र सदन'; आदित्य ठाकरेंची घोषणा

दरम्यान, शरयू नदीची महाआरती केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, यापूर्वी पहिल्यांदा मी इथं आलो होतो तेव्हा अशीच आरती झाली होती. तोच आपुलकीचा भाव मला आजही पहायला मिळाला. तीच प्रसन्नता या आरतीत दिसली त्यामुळं आणखी काय हवंय. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशातील शिवसैनिकही इथं आले आहेत. या दौऱ्यात मी राजकारणासाठी आलेलो नाही त्यामुळं मला कोणालाही काहीही संदेश द्यायचा नाही, असं यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com