ठाकरे कुटुंबीयांमुळे लक्ष्मण किला 'भगवा'मय

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

अयोध्या : राम मंदिराची प्रमुख मागणी घेऊन अयोध्या दौऱ्यावर गेलेल्या ठाकरे कुटुंबीयांमुळे लक्ष्मण किला भगवामय झाल्याचे पाहायला मिळाले. लक्ष्मण किला येथे संत-महंतांच्या साक्षीने उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब पूजा केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह अयोध्येला गेले आहेत. ठाकरे कुटुंबीय पहिल्यांदाच अयोध्येला गेले आहे. फैजाबादमध्ये हजारो शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले. उद्धव यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येला छावणीचे स्वरूप आले आहे. राज्य राखीव पोलिस दल, पोलिस यांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

फैजाबादहून उद्धव ठाकरे अयोध्येला रवाना झाले. हॉटेलहून भगवे कपडे परिधान करून उद्धव ठाकरे सहकुटुंब लक्ष्मण किला येथे दाखल झाले. यावेळ पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच 'जय भवानी, जय शिवाजी', 'जय श्रीराम'चे नारे शिवसैनिकांकडून देण्यात आले. उद्धव यांनी सहकुटुंब संत-महंतांकडून पूजा केली. तसेच आशीर्वाद कार्यक्रमात सहभागी झाले. आज सायंकाळी उद्धव ठाकरे शरयू नदीच्या किनारी आरती करणार आहेत. त्यानंतर उद्या रामलल्ला येथे दर्शन घेणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com