आयुष मंत्रालयातर्फे आज आयुर्वेद दिवस

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने उद्या (ता.28) धनत्रयोदशीनिमित्ताने राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा करण्यात येणार आहे. या वर्षी आयुर्वेदाच्या मदतीने मधुमेह नियंत्रण हा विषय घेण्यात आला आहे. या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्‌घाटन पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी आयुष मंत्री श्रीपाद नाईक असतील. या प्रसंगी नाईक यांच्या हस्ते आयुर्वेदाच्या साहाय्याने मधुमेहाचे उपचार हे सर्व देशभरात राबविण्यात येणार आहे.

Web Title: Ayush declared AYURVED DAY