‘आयुष’ ही अतिशय प्रभावी उपचारपद्धती- श्रीपाद नाईक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

पणजी : मातृभूमी सेवा प्रतिष्ठान आणि कोटा, राजस्थान येथील आयुर्वेदीक न्यूरो रुग्णालय आणि संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 21 ते 26 मे 2018 दरम्यान मोफत चिकित्सा आणि उपचार शिबीर आयोजीत करण्यात आले आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि मातृभूमी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज (ता.21) शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

आयुष अंतर्गत असलेल्या आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपथी या अतिशय प्रभावी उपचारपद्धती आहेत. केंद्र सरकारचे आयुष मंत्रालय पारंपरिक उपचारपद्धतींच्या प्रचार आणि प्रसारासाठी नेहमीच प्रयत्नरत असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी बोलताना श्रीपाद नाईक यांनी केले. राज्यासाठी नियोजीत 50 खाटांच्या दोन आयुष रुग्णालयाचे काम लवकरच सुरु होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.   

कोटा, राजस्थान येथील डॉ मनोज शर्मा यांनी न्युरो थेरपी ही उपचारपद्धती विकसित केली आहे. न्यूरो थेरपी, कॅपिंग थेरपी, ऍक्युपंक्चर, ऍक्युप्रेशर, अग्नीकर्म या उपचारपद्धतींच्या माध्यमातून फ्रोजन शोल्डर, मायग्रेन पेन, सर्विकल पेन, वोकल कॉड, पाठदुखी, पॅरालिसीस, स्लीप डिस्क या आजारांवर प्रभावी उपचार कमी कालावधीत करण्यात येतील, असे नाईक म्हणाले.  

दररोज सुमारे चारशे रुग्णांना सामावून घेण्याची या शिबिराची क्षमता आहे. मातृभूमी सेवा प्रतिष्ठान दरवर्षी 4 ऑक्टोबर रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करते. आतापर्यंत अशाप्रकारच्या शिबिरांमधून 4000 नेत्ररुग्णांना लाभ झाला आहे. तर, 200 नेत्ररुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे श्रीपाद नाईक यांनी सांगितले. या शिबिराचा लाभ मोठ्या प्रमाणावर घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.  

Web Title: ayush is very effective healing system said by shripad naik